चोरटे सुसाट : शहरातील विस्तारीत भागात एकाचवेळी चार बंद घरे फोडली

जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२२ । यावल शहरातील विस्तारीत भागात चार ठिकाणी चोरट्यांनी घरफोड्या केल्या आहेत. चांगली बाब अशी कि, फारसा काही मुद्देमाल चोरीस गेला नाहीये असे म्हटले जात आहे. एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी झाल्याने विस्तारीत भागातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.

यावल शहरात भुसावळ रस्त्यालगत विस्तारीत भागात गजानन सिटी व बालाजी सिटी आहे. यातील गजानन सिटीमधील रहिवासी कल्पना अरुण कुंभार या सहकुटुंब दोंडाईचा येथे वीट थापण्याच्या कामासाठी गेल्यानंतर त्यांच्याकडे चोरट्यांनी संधी साधली तर याच भागातील दोन बारी कुटुंबीय व एक फिरके यांचे बंद घर फोडण्यात आले. चार ही घरात मौल्यवान वस्तू नसल्याने चोरट्यांच्या हाती फारसे काहीही लागले नाही.

घरफोडीची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ हे पथकासह दाखल झाले व त्यांनी पाहणी करीत संबंधीत चार ही कुटुंबांशी संपर्क साधला मात्र, चार ही कुटुंबांनी घरात मौलवान काहीचं नव्हते असे सांगत पोलिसात तक्रार देणे टाळले.