जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२ । भगवान महावीर, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने खुल्या सामान्य-ज्ञान स्पर्धेचे आयोजन शिवसेना व युवासेना तर्फे आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा तसेच नुकत्याच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा दि.२४ एप्रिल रोजी राजीव गांधी टाऊन हॉल पाचोरा येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण आमदार किशोर पाटील यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.राजेंद्र चिंचोले हे होते.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पाचोर्याचे तहसीलदार कैलासजी चावडे, पाचोऱ्याचे पोलीस किसनराव पाटील, बिलोली येथील मुख्याधिकारी अमोल चौधरी, प्रतिभा चावडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख ऍड. अभय पाटील, स्वीय सहाय्यक राजेंद्र पाटील, डॉ. भरत पाटील, जितेंद्र जैन, शरद पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, मंदाताई पाटील, प्रवीण ब्राम्हणे, गजु पाटील, अनिकेत सूर्यवंशी, जितेंद्र पेंढारकर हे मान्यवर उपस्थित होते. आमदार किशोर पाटील यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेद्वारे यशाचे शिखर गाठावे व अधिकारी बनून समाजाची आणि देशाची प्रामाणिकपणे सेवा करावी तसेच प्रा. राजेंद्र चिंचोले यांच्या “स्पर्धा परीक्षा सारथी “या पुस्तकाच्या माध्यमातून योग्य करिअर निवडावे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी केंद्रीय व राज्य पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांची माहिती विद्यार्थ्यांना दिली व केंद्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन करिअरचे शिखर गाठावे. जिद्द परिश्रम व चिकाटीच्या जोरावर आपल्यातील क्षमता ओळखाव्या अशा प्रकारचे मार्गदर्शन त्यांनी केले.
यावेळी तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक किसनराव पाटील, प्रतिभा चावडे ऍड.अभय पाटील यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण ब्राह्मणे यांनी केले. सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थ्याना प्रमाणपत्र व प्रा.राजेंद्र चिंचोले लिखित “स्पर्धा परीक्षा सारथी”हे पुस्तक आमदार किशोर पाटील यांच्याकडून भेट देण्यात आले.
अमोल चौधरी व विशाल पाटील यांची मुख्याधिकारी पदी निवड झाल्याबद्दल, गायत्री शिंपी यांची न्यायालयात वर्ग एक अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल, कुणाल सिनकर याची इंटेलिजन्स ऑफिसर तसेच बँक प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड झाल्याबद्दल तर गौरव गोसावी यांची मार्केटिंग ऑफिसर पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. डॉ.भरत पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेते
प्रथम पारितोषिक – भैय्या शरीफ निंबोळे रुपये 5001, द्वितीय पारितोषिक – योगेश पंढरीनाथ राठोड व ईश्वर चौधरी प्रत्येकी रुपये 2501, तृतीय पारितोषिक – तन्मय सुनील शिंदे रुपये 2001, उत्तेजनार्थ बक्षीस – अभिषेक रतन पाटील व ऋत्विक सिताराम पाटील प्रत्येकी 1001, मुलीं मधून प्रथम – युगंधरा राजेंद्र सिंग पाटील रुपये 501, सर्वात कमी वयाचा स्पर्धक – गीतार्थ संदीप राऊळ रुपये 501
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गजु पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी यांनी केले. कार्यक्रमात परीक्षकांचा सत्कार करण्यात आला.