⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

मुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२२ । वाढती असुरक्षितता लक्षात घेता मुला-मुलींना स्वरक्षणाचे शिक्षण आणि धडे देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी केले. रविवारी गजानन कॉलनीत मार्शल आर्ट ट्रेनिंग सेंटरचे उद्धघाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंजीनियर राहुल सोनवणे, शैलेंद्र सोनवणे उपस्थित होते. शहरातील पुरुष, महिला आणि मुला-मुलींसाठी मार्शल आर्ट ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात आले. आठवड्यातून ६ दिवस वर्ग चालवले जातील. महिला व मुलींसाठी सेल्फ डिफेन्सचे स्पेशल वर्ग घेतले जातील. मार्शल आर्ट ट्रेनिंग सेंटरचे प्रशिक्षक आशिष वाणी हे राष्ट्रीय वुशू कुंगफु चे गोल्ड आणि ब्राऊन्स मेडल विजेते आहे.

यावेळी बंटी सोनवणे, अनिल देशमुख, आशिष ठाकरे, चिंटूआबा सोनवणे, नयन धनगर, सागर चौधरी, आकाश पारधे, मुनाफभाई, व नागरिक उपस्थित होते.

पहा व्हिडीओ प्रक्षेपण :

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/520199519216140

हे देखील वाचा :