जळगाव शहर

चर्चा तर होणारच ! जळगावच्या चिमुकल्याने थेट सचिन तेंडुलकरला लिहिले पत्र अन् त्यानेही दिले उत्तर..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२२ । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची जगातील महान खेळाडू म्हणून ओळख आहे. भारतासह इतर देशांमध्ये त्याच्या चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याला भेटण्यासाठी प्रत्येक जणांना आतुरता असते. चाहते तो दिसला की तिथं त्याला समोरासमोर पाहण्यासाठी प्रयत्न करत असतात. दरम्यान, अशातच एक जळगावमधील (Jalgaon) इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या चिमुकल्याने थेट सचिन तेंडुलकरला पत्र लिहिलंय. विशेष म्हणजे या पत्राला सचिनने देखील उत्तर दिलं आहे. नेमकं त्या पत्रात काय लिहिलेय हे जाणून घेऊयात.

सचिनचे पत्राला उत्तर..

अनय डोहाळे असे या पत्र पाठविणाऱ्या चिमुकल्याचा नाव आहे. सचिनने त्याच्या पत्राला उत्तर देताना लिहितो की, ‘मोठी स्वप्न बघ, खूप मेहनत कर, तुला यश मिळेल,’ असा सल्ला सचिन तेंडूलकर याने या पत्रातून दिलाय. सचिन तेंडूलकरने पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला थेट पत्र लिहिल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलाय. या पत्रासोबत सचिन तेंडुलकरनं स्वतःची सही आणि विश्वचषक हातात घेलेले दोन फोटोही पाठविले आहे. डोहाळे कुटुंबीय हे सचिनचं पत्र पाहून खूप आनंदी झाले आहे.

म्हणून पत्र पाठवलं?
जळगावमधील डोहाळे कुटुंबिय चार महिन्यापूर्वी मुंबईला फिरायला आलं होतं. मुंबई दर्शन करणाऱ्या गाईडनं सचिन तेंडुलकर याचं घर त्यांना दाखवलं. यावेळी अनय डोहाळं या चिमुकल्यानं सचिन तेंडुलकरचं घर पाहताच त्यानं त्याला भेटायचा आग्रह धरला. आई- वडिलांनाही त्यानं तसं सांगितलं. मात्र, कोणीही त्याच्या घरी जाऊन सहज भेटू शकत नाही. मग यावर आता काय करायचं असा प्रश्न डोहाळे कुटुबियांना पडला. यातच त्यांनी सचिनला पत्र पाठवायचं ठरवलं. अनयच्या हस्ते सचिला वाढदिवसानिमित्त पत्र लिहून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर ते हा विषय पूर्णपणे विसरले देखील होते. यातच चार महिन्यानंतर सचिनने स्वतःची सही असलेलं पत्र अनयला पाठवलं. यात त्याला भरपूर शुभेच्छा देत मेहनत करण्याचा सल्लाही दिला. पत्राचं उत्तर येईल अशी अपेक्षा नसताना सचिनने त्याला पत्र लिहून उत्तर पाठवल्यानं डोहाळे कुटुंबियांना खूप आनंद झालाय. मला उत्तर पाठविल्यानं खूप आनंद झाला आहे, असं अनय डोहाळे सांगतो.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button