शासकीय रुग्णालयाला व्हीलचेअर भेट

मार्च 29, 2022 1:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२२ । दिवंगत सुखलाल चैतराम विश्वकर्मा यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी महत्वाचे साधन म्हणून व्हीलचेअर सोमवारी रोजी भेट देण्यात आली.

vijhit jpg webp

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जैवशास्त्र प्रशालेचे प्राध्यापक डॉ. के. एस. विश्वकर्मा यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी त्यांचे वडील सुखराम विश्वकर्मा यांच्या स्मृतिदिनानिमित्त विधायक उपक्रम करण्याचे ठरवले. त्यांनी सोमवारी २८ मार्च रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, प्रशासन अधिकारी डॉ. संदीप पाटील यांच्या उपस्थितीत व्हीलचेअर रुग्णालयासाठी भेट दिली. यावेळी जीवरसायनशास्त्र विभागाचे डॉ. संजय गायकवाड उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now