⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव शहरात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२४ । लोकसभेनंतर आता राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा विधानपरिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. नाशिक शिक्षक मतदार संघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले असून आज किशोर दराडे यांच्या उत्तर महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव शहरात येणार आहे.

जळगाव विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघासाठी २६ जून रोजी मतदान होत आहे. प्रचारासाठी शैक्षणिक संस्था पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सायंकाळी ६ वाजता जळगाव येथे येत आहेत. आदित्य लॉनवर सायंकाळी ६ वाजता ही बैठक होईल. त्यात ते मार्गदर्शन करतील.