गुर्जर समाजबांधवांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार

जुलै 29, 2022 1:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मलबार हिलवरील नंदनवन निवासस्थानी गुर्जर समाजबांधवांकडून सत्कार करण्यात आला. अंबरनाथ चे माजी नगराध्यक्ष तथा जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील सुनील चौधरी यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, जामनेर, धरणगाव या तालुक्यातील गुर्जर समाज संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

jalgaon 2 2

सुनील चौधरी हे एकनाथ शिंदे यांचे खास विश्वासु मानले जातात. यावेळी गुर्जर समाज प्रतिष्ठानचे शिवाजी पाटील, भागवत पाटील, जे.जे.कॉलेजचे प्रा.राजेंद्र पाटील, कुलाबाहून रमाकांत पाटील, प्रशांत पाटील, अंकूश पाटील, रविंद्र पाटील यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, जामनेर, धरणगाव या तालुक्यातील गुर्जर समाज संघटनेचे अनेक पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच जळगाव जिल्ह्यात भेट देणार असून, या भेटीदरम्यान देखील गुर्जर समाजातील पदाधिकाऱ्यांसोबत जळगाव येथे चर्चा करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुर्जर समाजबांधवांच्या प्रतिनिधींना दिले. तसेच सुनील चौधरी यांनी आपल्या मुळ गावी म्हणजेच आव्हाणे येथे भेट देण्याचीही विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now