जळगाव जिल्हाभुसावळ

सणांनिमित्त प्रवाशांना दिलासा! भुसावळ मार्गे हडपसर-प्रयागराज ट्रेन धावणार, कुठं-कुठे असणार थांबा?

जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळी व आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमध्ये होणारी प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवास अधिक सोयीस्कर व्हावा यासाठी हडपसर (पुणे) ते प्रयागराज दरम्यान विशेष ‘उत्सव विशेष गाडी’ चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

train

महाराष्ट्र आणि उत्तर भारताला जोडणाऱ्या या विशेष ट्रेनमुळे उत्तर भारतात जाणाऱ्या, तसेच मध्य महाराष्ट्रातून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना, विशेषतः भुसावळ आणि खान्देशातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गाडीचे वेळापत्रक व फेऱ्या खालीलप्रमाणे:
गाडी क्रमांक ०४१०८ हडपसर ते प्रयागराज ही विशेष गाडी २२ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत दर गुरुवारी हडपसर येथून रात्री १०:४० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ६:३० वाजता प्रयागराज येथे पोहोचेल.

तर परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०४१०७ प्रयागराज ते हडपसर ही गाडी २१ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत दर बुधवारी प्रयागराज येथून सकाळी १०:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७:३० वाजता हडपसर येथे पोहोचेल.

‘या’ प्रमुख स्थानकांवर असेल थांबा:

प्रवाशांच्या सोयीसाठी या सण विशेष गाडीला दोन्ही मार्गांवर महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती, बीना, ललितपूर, तिकमगड, एमसीएस छतरपूर, दरियागंज, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकूट धाम, माणिकपूर, डभौरा आणि शंकरगढ या प्रमुख रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

दिवाळीच्या काळात गाड्यांचे बुकिंग फुल्ल असल्यामुळे प्रवाशांची होणारी ऐनवेळची धावपळ थांबवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने चालवलेल्या या उत्सव विशेष ट्रेनचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button