मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उतरले जळगाव विमानतळावर ! अन्…
जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । धुळे येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाअंर्तगत मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे धुळे दौर्यावर चालले होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांना जळगाव विमानतळावर आपले विमान उतरावे लागले.
संपर्ण शासन आपल्या दारी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत आहे. यात लाभार्थ्यांना थेट लाभाचे वाटप करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज धुळे येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी दोनच्या सुमारास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री धुळे येथे जाणार होते.मात्र खराब हवामानामुळे त्यांचे विमान जळगाव विमानतळावर उतारण्यात आले. त्यानंतर ते कारने धुळ्याला रवाना झाले. यावेळी रज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शासन आपल्या दारी अभियानातंर्गत धुळे जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी आज दुपारी जळगाव विमानतळावर आगमन झाले. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय रस्ते मार्गाने धुळेकडे रवाना झाले. खराब हवामानामुळे मुख्यमंत्री महोदयांचे विमान धुळे विमानतळाऐवजी जळगाव विमानतळावर उतरविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. तात्काळ ताफ्याची व्यवस्था करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे धुळ्याकडे रवाना झाले.