आता त्यांचे काम म्याव म्याव करण्याचे ; मंत्री गुलाबरावांची आदित्य ठाकरेंवर टीका
जळगाव लाईव्ह न्यूज । 18 फेब्रुवारी 2024 । ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना थेट आव्हान दिल. तुम्ही राजीनामा द्या, मी तुमच्या मतदार संघात येऊन निवडणूक लढवायला तयार आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या आव्हानाला आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले मंत्री पाटील?
आदित्य ठाकरे यांच्याकडे आता कोणतेही भांडवल शिल्लक राहिले नाही. गल्ली बोळातील नेत्यांच्या सारखी त्यांची अवस्था झाली आहे. आदित्य ठाकरेंच्या जळगाव मधील सभेत पाचशेच्या वर खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे ते आता केवळ म्याव म्याव करण्याचे ते काम करत असल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
दोन्ही समाजांना न्याय मिळणार – गुलाबराव पाटील
उद्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन होत आहे. याबाबत गुलाबराव पाटील म्हणाले की, उद्याच्या अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शिक्कामोर्तब होईल. मराठा समाज आणि ओबीसी समाज या दोघांना न्याय मिळेल, असा विश्वास यावेळी गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी जनतेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.