जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२१ । भुसावळ शहरातील एमआयडीसी परीसरात असलेल्या केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना आज मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडलीय. या आगीत संपूर्ण फॅक्टरी जळून खाक झाली. दरम्यान, या आगीमागचे कारण अद्यापही कळू शकले नाहीय.

आगीचे स्पष्ट कारण अद्याप कळू शकलेले नाही. मंगळवारी सकाळी कंपनीतून आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागलाच सुज्ञ नागरीकांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती कळवल्यानंतर दीपनगर व भुसावळ पालिकेच्या बंबाने घटनास्थळी धाव घेतली.

समजलेल्या माहितीनुसार, रेल नीर प्रकल्पाजवळील एफ- 21 येथे केमिकल बनवणारी फॅक्टरी असून ती जळगावातील व्यापारी मयूर भोळे यांची असल्याचे समजते. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
हे देखील वाचा :
- रेल्वे प्रवाशांना दिलासा! भुसावळ–दादरसह ‘या’ एक्स्प्रेसच्या कालावधीत वाढ
- Bhusawal : तरुणीला लग्नाचे वचन देऊन शारीरिक संबंध, नंतर लग्नास नकार; तरुणासह तिघांवर गुन्हा
- जळगाव-उधना मार्गावरील प्रवाशांना दिलासा; ‘ही’ विशेष एक्स्प्रेस पुन्हा धावणार
- भावी शिक्षकांसाठी खुशखबर ! महाराष्ट्रात शिक्षकांच्या 30 हजार 209 पदांची महाभरती सुरु
- जळगावात आज वादळी पावसाची शक्यता, IMD कडून येलो अलर्ट जारी










