चाळीसगाव मतदारसंघात कोणता आमदार निवडून येणार? पाहा exit Poll

नोव्हेंबर 22, 2024 1:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता निकालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मतदारसंघात भाचपचे मंगेश चव्हाण आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्यात टफ फाईट पाहायला मिळाली. या मतदारसंघात भाजपचे मंगेश चव्हाण यांचं पारडं जड दिसतंय. या मतदारसंघात मंगेश चव्हाण विजयासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

Chavan patil

भाजपचे मंगेश चव्हाण या मतदारसंघात बाजी मारु शकतात, असा अंदाज एका वृत्त समूहाच्या एक्झिट पोलमधून वर्तविण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून उन्मेष पाटील यांनी देखील टफ फाईट दिली. मात्र जनतेचा कल भाजप आमदारांच्या दिशेने असल्याचं चित्र आहे.

चाळीसगाव मतदार संघातील मतदारांनी मंगेश चव्हाण यांना पसंती दिल्याचं दिसून येत आहे. तर ठाकरे गटाचे उमेदवार उन्मेष पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागू शकतं. मंगेश चव्हाण हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now