⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

बीएसएफचे निवृत्त जवानास फसवले; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२२ । चोपडा शहरातील लुंबिनी वन येथील साइटवरील प्लॉट यावल येथील बीएसएफचे निवृत्त जवान नीलेश भिमराव अढावगे यांनी ३ लाख ७५ हजारांना भिमान ग्रुपचे मालक सतीश वाडे यांच्याकडून घेतला होता. परंतु पैसे देऊनही प्लॉट नावावर केला नाही म्हणून नीलेश अढावगे यांच्या फिर्यादीवरून सतीश वाडे यांच्यासह इतर तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, शहरातील लुंबिनी वन येथील साइटवर १ हजार ४७३ स्क्वेअर फुट प्लॉट (क्रमांक ५५/डब्ल्यू) सतीश वाडे यांनी निवृत्त बीएसएफ जवान व यावल तालुक्यातील काेळवद येथील रहिवासी नीलेश भिमराव अढावगे (वय ४१) यांना विक्री केली. यात ठरलेल्या रकमेपैकी नीलेश अडावगे यांनी संशयितांना २ लाख २५ हजार रुपये धनादेशाद्वारे व ऑनलाइन १ लाख ५० हजार रुपये असे एकूण ३ लाख ७५ हजार दिले आहेत. परंतु, पैसे देवूनही संशयितांनी हा प्लॉट नीलेश अढावगे यांना खरेदी करून दिला नाही. त्यामुळे नीलेश अढावगे यांनी वाडे यांना दिलेले पैसे परत करण्याची मागणी केली. या पैशातून एक लाख रुपये परत करून आजपर्यंत उर्वरित २ लाख ७५ हजार रुपये देण्यास त्यांनी नकार दिला. या प्रकरणी नीलेश अढावगे यांच्या फिर्यादीवरुन सतीश वाडे, जितेंद्र वाडे, विशाल संदानशिव, बाविस्कर (पूर्ण नाव माहीत नाही) या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

हे देखील वाचा :