वाणिज्य

Cheap OnePLus Phone : 1+ कंपनीचा हा फोन झाला तब्बल पाच हजार रुपयांनी स्वस्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । Cheap OnePLus Phone । वाढत्या तंत्रज्ञानाच्या योगामुळे प्रत्येक जण स्वतःकडे फोन ठेवतोच. हा फोन साधासुधा नसतो मात्र कित्येकदा तो स्मार्टफोन असतो(Smart phone). मात्र स्मार्टफोन घ्यायचा तर चांगला कंपनीचा असा सर्वसामान्य नागरिकांचा मानस असतो. मात्र जर ब्रँडेड कंपनीचे फोन बघितले तर ते प्रचंड आणि प्रचंड महाग असतात अशा वेळी नागरिक वाट बघतात ती म्हणजे या ब्रँडेड कंपनीचे फोन स्वस्त होण्याची. आणि नागरिकांना अशीच एक खुशखबर मिळाली आहे. कारण वन प्लस या कंपनीने आपल्या एका फोनची किंमत तब्बल पाच हजार रुपयांनी कमी केली आहे. (Cheap 1+ Phone)

देशातील सर्वात दोन चांगले फोन कोणते ? तर ज्या दोन कंपन्या सहज नागरिकांच्या तोंडावर येतात त्या म्हणजे वन प्लस आणि अँपल. अँपल दर वर्षी नवीन नवीन फोन लॉन्च करून आपल्या कंपनीच्या फोनची किंमत कमी करत असतं. यामुळे नागरिकांचा कल साहजिकच अँपलकडे असतो. मात्र आता वन प्लस चे फोन देखील स्वस्त झाले असून वन प्लस ने आपल्या एका फोनची किंमत तब्बल पाच हजार रुपयांनी कमी केली आहे.

वन प्लस या कंपनीने 2022 च्या पहिल्या फ्लॅगशिप स्मार्टफोनची किंमत भारतामध्ये कमी केली आहे. वन प्लस टेन प्रो या (1+10pro)फोनची किंमत वन प्लस कंपनीने तब्बल पाच हजार रुपये ने कमी केली आहे. यामुळे वन प्लस विकत घेणाऱ्या सर्व ग्राहकांना यासारखी चांगली बातमी दुसरी कोणतीच असू शकत नाही.

२०२२च्या सुरुवातीला वन प्लस ने वन प्लस टेन प्रो लॉन्च केलेला, OnePlus 10 Pro दोन प्रकारांमध्ये येतो – 8GB + 128GB आणि 12GB + 256GB ची किंमत अनुक्रमे 66,999 आणि Rs 71,999 आहे. किमतीत कपात केल्यानंतर, ग्राहक 8GB रॅम प्रकार 61,999 रुपयांना आणि 12GB RAM मॉडेल 66,999 रुपयांना खरेदी करू शकतात.




			
		

Related Articles

Back to top button