⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | वाणिज्य | गुढीवाडव्याच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करायचीय ; जळगाव सुवर्णपेठील आताच भाव वाचा..

गुढीवाडव्याच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करायचीय ; जळगाव सुवर्णपेठील आताच भाव वाचा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२४ । आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेली मागणी, भारतात लग्नसराईची खरेदी अशा वेगवेगळ्या कारणांनी सोने-चांदीचे भाव दररोज वाढतच जात आहे. यातच आज मंगळवारी गुढीवाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जण सोने- चांदी खरेदी करतात. त्यामुळे भाव काय राहतात? या कडे आता ग्राहकांचे लक्ष आहे. Gold Silver Rate 9 April 2024

मात्र देशात प्रसिद्ध असलेल्या सुवर्णपेठ जळगावमध्ये चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ होऊन ती एक हजार ५०० रुपयांनी वधारली. त्यामुळे चांदी ८३ हजार रुपये प्रति किलो अशा उच्चांकीवर पोहोचली. चांदीचा आतापर्यंतचा हा सर्वाधिक भाव आहे. दुसरीकडे सोन्याच्या भावात वाढ होऊन ते ७१ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.

आता चांदीची घौडदौड
मार्च महिन्यापासून भाववाढ होत असलेल्या दोन्ही मौल्यवान धातूंपैकी सुरुवातीला सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत गेले. त्यात चांदीत फारसी वाढ होत नव्हती. आता मात्र तीन दिवसांपासून सोन्यात कमी आणि चांदीमध्ये जास्त वाढ होत आहे.

आठ दिवसात चांदीत सात हजारांची वाढ
दिनांक-सोने-चांदी
१ एप्रिल- ६९,४००-७६०००
४ एप्रिल – ७०,०००-७९,२००
५ एप्रिल – ७०,२५०-७९,५००
६ एप्रिल – ७१,१००-८०,९००
७ एप्रिल – ७१,२५०-८१,५००
८ एप्रिल – ७१,३००-८३,०००

आज खरेदीचा मुहूर्त
मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने-चांदीची खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे या दिवशी या दोन्ही मौल्यवान धातूचे काय भाव राहतात, याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.