देवकर कुटुंबातील सदस्याचा जिल्हा दुध संघात प्रवेश, छायाताई देवकर विजयी

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२२ । जळगाव जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुकीत महिला राखीवमधून शेतकरी विकास पॅनलच्या पूनम प्रशांत पाटील आणि छायाताई गुलाबराव देवकर यांचा विजय झाला आहे. Jalgaon Jilha dudh Sangh Election

या निवडणुकीमध्ये महिला राखीवसाठी असणार्‍या दोन जागांमध्ये दोन्ही पॅनलला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.या माध्यमातून गुलाबराव देवकर यांच्या कुटुंबातील सदस्याने जिल्हा दुध संघात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे देखील वाचा :
दूध संघ निवडणूक निकाल : खडसे पॅनलने खाते उघडलं, ‘हे’ झाले विजयी

दरम्यान, काल झालेल्या मतदानानंतर आज जळगाव जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आज सकाळी ८ वाजेपासून या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. यात काही निकाल हाती आले आहे.