⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

दूध संघ निवडणूक निकाल : खडसे पॅनलने खाते उघडलं, ‘हे’ झाले विजयी

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२२ । मागील काही दिवसापासून गाजत असलेल्या जळगाव जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज रविवारी सकाळी ८ वाजेपासून सुरुवात झालेली आहे. यात खडसे गटाचं खात उघडलं आहे. ओबीसी मतदार संघात पराग मोरे विजयी झाले आहे. Jalgaon Jilha Dudh Sangh Election

ते ३१ मतांनी विजयी झाले आहे. जिल्हा दुध संघात ओबीसी मतदारसंघातून पराग मोरे यांची लढत शेतकरी विकास पॅनलच्या गोपाळ भंगाळे यांच्यासोबत होती. या लढतीत मोरे यांनी बाजी मारली आहे. ते माजी खासदार तथा माजी दुध संघ संचालक वसंतराव मोरे यांचे पुत्र आहेत. त्यांनी ३१ मतांनी विजय संपादन केला असून यामुळे सहकार पॅनलने खाते उघडले आहे.

दरम्यान, दुसरीकडे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू असलेले अरविंद देशमुख हे विजयी झाले आहे. ते 90 मतांनी विजयी झाले. तर दुसरीकडे शेतकरी विकास पॅनलकडून भुसावळ मतदार संघातील भाजपचे आमदार संजय सावकारे हे देखील विजयी झाले आहे. आ. सावकारे 76 मतांनी विजयी झाले आहे.

भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी शेतकरी विकास पॅनलकडून अनुसुचीत जाती या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरूध्द ब्रह्मे यांनी उमेदवारी केली होती. या लढतीत सावकारे यांचे पारडे जड मानले जात होता. निकालातून तसे अधोरेखीत झाले. सावकारेंनी अगदी सहजगत्या विजय संपादन केला. ते आधीच जिल्हा बँकेत संचालक असून आता जिल्हा दुध संघात देखील त्यांची एंट्री झाली आहे. लक्षणीय बाब म्हणजे आज अर्थात ११ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे. याच दिवशी त्यांना दुध संघातील विजयाच्या स्वरूपात मोठे गिफ्ट मिळाले आहे.

दरम्यान, काल म्हणजेच शनिवारी १९ जागांसाठी जिल्ह्यातील ७ मतदान केंद्रावर ४४१ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा दूध संघाच्या मतदानात १०० टक्के मतदान झाले आहे. १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते.