ट्रेड मार्कचा अनधिकृत वापर केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

नोव्हेंबर 28, 2021 2:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । नाशिक येथील एका कंपनीच्या नावाच्या ट्रेड मार्कचा अनधिकृत वापर करून अगरबत्ती विक्री केल्याप्रकरणी जळगावातील तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावातील नवीपेठेतील गणेश बिल्डिंगच्या मागे असलेल्या मे. हस्ती सुगंधी दुकानदाराने नाशिक येथील हकिकुल्लाह हाफीज उल्लाह खान (वय-३३) रा. नाशिक यांच्या मालकीचे रिलॅक्सो डोमेश्वर, नाशिक या कंपनीच्या नावाचा ट्रेड मार्कचा अनधिकृत वापर करून अगरबत्ती विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला. ८ सप्टेंबर २०१९ पासून ते २७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत हा प्रकार सुरू होता. हा प्रकार नाशिक येथील हकिकुल्लाह हाफीज उल्लाह खान यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी २७ नोव्हेंबर रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दाखल केली.

त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात संशयित अमिशा नयन शाह, नयम दिनेशकुमार शाह आणि मे. हस्ती सुगंधिचे मालक (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now