जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२५ । कटनी-भुसावळ दरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेसच्या खंडवा-भुसावळ या दरम्यानच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. १ सप्टेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

कटनी-भुसावळ (गाडी क्र. १९०१४) एक्स्प्रेसच्या वेळेत बदल असा असेल. खंडवा स्थानकात आगमन : दुपारी ३:१५ वाजता, बरगाव गुजर येथे ३:२९ वाजता, डोंगरगाव स्थानकात ३:५४ वाजता, सागफाटा येथे ४:०४ वाजता आगमन होईल. नेपानगर येथे ४:१८ वाजता, बऱ्हाणपूर येथे ४:४२ वाजता, वाघोडा रेल्वे स्थानकात ४:५९ वाजता आगमन आणि ५ वाजता प्रस्थान, रावेरला ५:०९ वाजता आगमन आणि ५:१० वाजता प्रस्थान, निंभोरा येथे ५:१९ वाजता आगमन आणि ५:२० वाजता प्रस्थान, सावदा येथे ५:३९ वाजता आगमन आणि ५:४० वाजता प्रस्थान आणि भुसावळ रेल्वे स्थानकावर या गाडीचे सायंकाळी ६:३५ वाजता आगमन होईल, असे रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.









