10 जुलैपासून रेल्वेच्या आरक्षण चार्टच्या नियमात बदल ; नवीन नियम जाणून घ्या…

जुलै 11, 2025 7:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२५ । भारतात रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रेल्वे व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी गेल्या काही दिवसांत रेल्वेने अनेक मोठी पावले उचलली आहेत. नुकताच रेल्वेनं तात्काळ तिकीट बुक करण्याच्या नियमात बदल केला. ज्याचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांना मिळत आहे. अशातच आता रेल्वेनं आरक्षण चार्टच्या नियमांमध्येही मोठा बदल केला आहे. रेल्वेच्या नवीन नियमांनुसार, आता लोकांना त्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही हे एक दिवस आधीच कळेल.

train chart

रेल्वेनं आरक्षण चार्टच्या नियमांत बदल केल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे बोर्डाच्या नवीन नियमानुसार, सर्व झोनमध्ये आरक्षण चार्ट १० जुलैपासून आठ तास आधी होणार आहे. यामुळे प्रतिक्षा यादीत तिकीट असणाऱ्या प्रवाशांना तुमचे तिकीट आरक्षित झाले की नाही हे आठ तास आधीच समजणार आहे.

त्यापूर्वी प्रवाशांना चार तास आधी तिकीट आरक्षण झाले की नाही, समजत होते. त्यामुळे तिकीट आरक्षित न झाल्यास प्रवाशांना ऐनवेळी पर्यायी प्रवास करण्याचा पर्याय शोधावा लागत होता. परंतु आता आठ तास आधी तिकीट आरक्षण समजणार असल्यामुळे प्रवाशांना वेळ मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या झोनमध्ये १० तारखेपासून या प्रणालीची सुरुवात होणार आहे.

रेल्वेने नियमात कोणते बदल केले आहेत?

१. सकाळी ५ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुटणाऱ्या गाड्यांसाठी, पहिला आरक्षण चार्ट शक्यतो आदल्या दिवशी रात्री ११:०० वाजेपर्यंत तयार केला जाईल.
२. दुपारी २ ते रात्री २३:५९ आणि ००:०० ते ५:०० वाजेपर्यंत सुटणाऱ्या गाड्यांसाठी, पहिला आरक्षण चार्ट शक्यतो ८ तास आधी तयार केला जाईल.
३. दुसरा आरक्षण चार्ट तयार करण्याबाबतच्या विद्यमान तरतुदींमध्ये कोणताही बदल होणार नाही.
४. या सूचनांमध्ये दुर्गम ठिकाणी चार्टिंगचाही समावेश आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now