⁠ 
सोमवार, मे 6, 2024

सत्ताबदलाचा जळगावकरांना फटका : प्रभातील निधी पळविला !

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२३ । शहरातील प्रभाग क्रमांक १४, प्रभाग क्रमांक १६ व मेहरूण तलावाच्या विकासासाठी शासनाकडून मिळालेला निधी प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर कामे सुरु होणार त्यापुर्वीच प्रस्तावित कामे रद्द करून प्रभाग क्रमांक ११ मधील कामांसाठी हा निधी वळविण्यात आला आहे.


राज्यशासनाकडून शहरातील रस्त्यांसाठी मुलभूत सोईसुविधा अंतर्गंत १५ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. या निधीतून शहरातील प्रभाग क्रमांक १४ व १६ मधील रस्त्यांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. तसेच मेहरूण तलावाची संरक्षण भिंत व विकास कामाचा देखील त्यामध्ये सामावेश होता. या कामांचे इस्टिमेट झाले, तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता देखील मिळाली होती. त्यामुळे सदर कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यात येवून प्रत्येक्ष कामांना सुरुवात होणार होती.

मात्र, त्याच वेळी प्रस्तावित कामे रद्द करण्यात येवून प्रभाग क्रमांक १४, १६ व मेहरूण तलावाच्या विकास कामाचा निधी प्रभाग क्रमांक ११ मध्ये वळविण्यात आला. श्रेय वादामुळे विकास कामांचा निधी इकडे तिकडे पळवापळवी सुरु असून यामुळे होणाऱ्या कामांना ब्रेक लागत आहे. परिणामी नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.