जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२५ । तुम्हीही रेल्वेनं प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने महाकुंभ मेळाव्याच्या दरम्यान भुसावळ विभागातून जाणाऱ्या चार रेल्वेच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. १७ आणि १८ फेब्रुवारीला धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांचा यात समावेश असून तर पुणे जम्मू तवी झेलम एक्स्प्रेस आजपासून ४ मार्चदरम्यान रद्द करण्यात आलीय.

रेल्वे क्रमांक १५०५७ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर काशी एक्सप्रेसचा १७ रोजी प्रवास सुरू होईल, ही गाडी आपल्या निर्धारित मार्गाऐवजी इटारसी, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, बाराबंकी मार्गे गोरखपूरला जाईल. रेल्वे क्रमांक ११०७१ लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी कामायनी एक्सप्रेस १७ रोजी निर्धारित मार्गाऐवजी बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, जौनपूर मार्गे वाराणसीला जाईल. १५०१८ गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस काशी एक्स्प्रेस १७ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत प्रवास सुरू होणारी ही गाडी आपल्या निर्धारित मागएिक्जी बाराबंकी, उनक, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई लखनक, झांसी, बीना, इटारसीमार्गे लोकमान्य टिळक टर्मिनसला जाईल. ११०७२ वाराणसी-लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्स्प्रेस १७ ते १८ फेब्रुवारीच्या कालावधीत जौनपुर, लखनऊ, कानपुर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणार आहे.
महाकुंभसाठी वलसाड ते दानापूर एक्स्प्रेस धावणार
देशभरातून प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्याला भाविक हजेरी लावत आहेत. रेल्वेत होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी महाकुंभसाठी वलसाड ते दानापूर दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय य घेण्यात आला आहे. दोन रेल्वे धावणार असून, त्यांना भुसावळला थांबा असेल. जळगावच्या भाविकांना तेथे जावे लागेल. कुंभमेळा विशेष ०९०९९ ही रेल्वे २३ रोजी वलसाड येथून सकाळी ८.४० वाजता सुटेल आणि भुसावळला दुपारी ४.१५ वाजता थांबा घेईल. महाकुंभ येथून पुन्हा परतीला निघण्यासाठी कुंभमेळा विशेष ०९०२० ही गाडी २४ रोजी दानापूर येथून रात्री १०.३० वाजता सुटेल. या दोन्ही गाड्यांना नवसारी, नंदुरबार, अमळनेर, भुसावळ स्थानकांवर थांबा आहे. एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, पाच वातानुकूलित तृतीय श्रेणी, १४ शयनयान, दोन सामान्य द्वितीय श्रेणी, २ लगेज-कम-गार्ड ब्रेक न अशी कोच संरचना आहे.
झेलम गाडी आजपासून तात्पुरती रद्द
उत्तर रेल्वेतील जम्मूतवी रेल्वे स्थानकावर पुनर्विकास आणि यार्ड कनेक्शन संदर्भातील नॉन-इंटरलॉकिंग कार्य सुरू असल्याने भुसावळ विभागातून धावणाऱ्या दोन रेल्वे तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्या आहेत. यात रेल्वे क्रमांक ११०७७ पुणे ते जम्मूतवी झेलम एक्स्प्रेस ही १७ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत रद्द राहणार आहे. तसेच रेल्वे क्रमांक ११०७८ जम्मूतवी ते पुणे झेलम एक्स्प्रेस १९ फेब्रुवारी ते ६ मार्चपर्यंत रद्द राहणार आहे. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी
संबंधित रेल्वे हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.