जळगाव जिल्हा

भुसावळ मार्गे धावणाऱ्या रेल्वे ‘या’ गाड्यांच्या क्रमांक आणि रचनेत बदल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे भुसावळ मार्गे धावणाऱ्या काही एक्स्प्रेसच्या रचनेत आणि क्रमांकात रेल्वे प्रशासनाने बदल केला आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -आसनसोल एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस -भागलपूर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस -गोडा एक्सप्रेस आता सुधारित रचनेने धावणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पटना एक्सप्रेस सुधारित गाडी क्रमांक आणि रचनेने धावणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पटना सुपरफास्ट एक्सप्रेस
82356 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पाटणा सुपरफास्ट एक्सप्रेस 04 मार्च 2025 पासून सुधारित गाडी क्रमांक 22360 सह धावेल.
82355 पाटणा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस 02 मार्च 2025 पासून सुधारित गाडी क्रमांक 22359 सह धावेल.
सुधारित रचना (22360/22359):
2 वातानुकूलित द्वितीय, 5 वातानुकूलित तृतीय, 5 तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी, 6 स्लीपर क्लास ,1 गार्ड्स ब्रेक व्हॅन, 1 एसी पँट्री कार आणि 1 जनरेटर व्हॅन.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-आसनसोल एक्सप्रेस
12362 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -आसनसोल एक्सप्रेस 22 जानेवारी 2025 पासून सुधारित रचनेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून धावेल.
12361 आसनसोल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस 19 जानेवारी 2025 पासून सुधारित रचनेने आसनसोल येथून धावायला सुरुवात झाली आहे.
सुधारित रचना (12362/12361):
2 वातानुकूलित द्वितीय, 6 वातानुकूलित तृतीय, 7 स्लीपर क्लास, 4 जनरल सेकंड क्लास, 1 गार्ड्स ब्रेक व्हॅन, 1 एसी पँट्री कार आणि 1 जनरेटर व्हॅन.

लोकमान्य टिळक टर्मिनस -भागलपूर एक्सप्रेस व लोकमान्य टिळक टर्मिनस -गोडा एक्सप्रेस
12336/12335 लोकमान्य टिळक टर्मिनस -भागलपूर एक्सप्रेस 19 जानेवारी 2025 पासून सुधारित रचनेने लोकमान्य टिळक टर्मिनस येथून व 17 जानेवारी 2025 पासून भागलपूर येथून धावत आहे.
22312 लोकमान्य टिळक टर्मिनस -गोडा एक्सप्रेस 23 जानेवारी 2025 पासून सुधारित रचनेने एलटीटी येथून धावेल.
22311 गोडा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 19 जानेवारी 2025 पासून सुधारित रचनेने गोडा येथून धावत आहे.
सुधारित रचना (12336/12335 व 22312/22311): 2 वातानुकूलित द्वितीय, 5 वातानुकूलित तृतीय, 8 स्लीपर क्लास, 4 जनरल सेकंड क्लास, 1 गार्ड्स ब्रेक व्हॅन,1 एसी पँट्री कार आणि 1 जनरेटर व्हॅन.

प्रवाशांनी तिकीट आरक्षणापूर्वी या बदलांची नोंद घ्यावी.
गाड्यांच्या थांब्यांवरील वेळा तपशीलवार पाहण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button