⁠ 
शनिवार, मे 18, 2024

अपघातातील मृताच्या वारसांना दिला‎ १० ‎लाखांचा धनादेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । एरंडोल‎ येथील रहिवासी नितीन उत्तम‎ जयस्वाल यांनी येथील एसबीआय शाखेत अपघाती विमा ५००‎ रुपये भरून काढला होता. काही ‎महिन्यापूर्वी त्यांचे अपघाती निधन ‎झाले. त्यांच्या वारसांना विम्याचा १० ‎लाखांचा धनादेश नुकताच देण्यात ‎आला.‎

एरंडोल एसबीआयचे‎ व्यवस्थापक आशीष मेढे यांनी ‎वारसदारांशी संपर्क साधून त्यांना ‎आवश्यक कागदपत्रे देण्याचे‎ आवाहन केले. तसेच त्यांनी‎ विम्याची रक्कम मिळवून‎ देण्यासाठी पाठपुरावा केल्याने विमा‎ मंजूर झाला. त्यामुळे मध्यमवर्गीय‎ कुटुंबातील कर्ता पुरुष‎ गमावल्यानंतर, त्या कुटुंबाला‎ आर्थिक हातभार लावण्यास‎ ‎विम्याची रक्कम उपयोगी ठरणार‎ आहे. मृत जयस्वाल यांच्या पत्नी‎ खुशबू जयस्वाल यांच्या खात्यावर‎ विम्याची रक्कम जमा करण्यात‎ आली आहे.

यावेळी मृताचे मोठे‎ बंधू संदीप जयस्वाल, पत्नी खुशबू‎ जयस्वाल व त्यांचा मुलगा व मुलगी‎ यांचेसह सहाय्यक प्रबंधक मुकेश‎ दलाल, क्षेत्रीय प्रबंधक सौरव‎ पाटील, शाखा व्यवस्थापक‎ अनुराधा नंदनवार, लेखापाल‎ आशिक सोनवणे, एसबीआय‎ जनरल इन्शुरन्सचे कर्मचारी राहुल‎ कदम, सचिन वैद्य उपस्थित होते.‎

हे देखील वाचा :