जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२१ । राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येत्या २ नाेव्हेंबरपासून राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. खरिपातील कापूस वेचणी, मका, ज्वारी, साेयाबीन काढणी ही कामे सध्या सुरू आहेत. पावसाच्या अंदाजामुळे पुढील चार दिवसांत शेतीची अपूर्ण कामे पूर्ण करावी लागणार आहेत.
गेल्या पंधरवड्यात अवकाळीने खरिपाच्या उर्वरित उत्पन्नावर पाणी फेरले. साेयाबीन, ज्वारी आणि मका काढणी सुरू आहे. कापूस वेचणीही सुरू आहे. अशातच हवामान विभागाकडून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २ नाेव्हेंबरपासून राज्यात विशेषत: उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
उशिरापर्यंत असलेला परतीचा पाऊस आणि त्यानंतरच्या अवकाळी पावसाने खरिपाच्या उत्पन्नावर पाणी फेरले आहे. शेतकरी सध्या जनावरांचा चारा वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत.