⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय! जळगावमध्ये पुढील ३ दिवस पावसाची शक्यता

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय! जळगावमध्ये पुढील ३ दिवस पावसाची शक्यता

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२४ । जळगावसह राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली. यांनतर ऊन आणि असह्य करणाऱ्या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने आजही जळगावसह काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. आगामी तीन दिवस जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
हवामान विभागाने सोमवारी राज्यभरात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला होता, तर विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र, कोकणातील सर्वच जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसानेजोरदार हेजेरी लावली. दरम्यान, हवामान विभागाकडून आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला आहे.

तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जळगावात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता
दरम्यान, मागील काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने उकाड्यात मोठी वाढ झाली. अशातच सोमवारी जळगाव शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात २२ ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता आहे. या कालावधीत हवेत ८५ ते ९०% आर्द्रता राहणार आहे. परिणामी उकाडा जाणवू शकतो.

जळगाव जिल्हातील तालुकानिहाय पर्जन्यमान आकडेवारी (MM) 20/8/2024
मुक्ताईनगर -23
अमळनेर-57.8
यावल -26.3
पाचोरा -5
जामनेर -7
एरंडोल -25
रावेर -10
बोदवड-8
धरणगाव -21
जळगाव -18

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.