जळगाव जिल्हा

१४ डिसेंबरपासून शुक्राचा अस्त ; विवाहसोहळे आता थेट फेब्रुवारीपासून, असे आहेत मुहूर्त

जळगाव लाईव्ह न्यूज । विवाह ठरलेल्या अनेक वधू-वरांसाठी आता प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण १४ डिसेंबरपासून ते थेट ३० जानेवारी २०२६ पर्यंत शुक्रास्त असल्याने विवाह अन् वास्तुशांती मुहूर्तांना तब्बल दीड महिन्यांचा ब्रेक लागणार आहे. त्यामुळे विवाहसोहळे आता थेट फेब्रुवारी २०२६ पासूनच सुरू होणार आहेत.

wedding

५ डिसेंबर ही महाराष्ट्रीयन पंचांगानुसार विवाहाची शेवटची शुभ तारीख होती. त्यानंतर १४ डिसेंबरच्या आसपास शुक्रास्त सुरू होत आहे. जेव्हा शुक्रास्त सुरु होते तेव्हा लग्नासह मुंज, गृहप्रवेश, वास्तुशांती आणि भूमिपूजन यासारखी महत्त्वाची शुभकार्ये टाळली जातीलसर्व शुभ कार्यक्रम पुढे ढकलले जातात. जानेवारी २०२६ मध्ये लग्नाच्या कोणत्याही तारखा उपलब्ध नसतील. विवाह समारंभांसाठी थेट ३ फेब्रुवारी २०२६ पासूनच मुहूर्त उपलब्ध होणार आहेत.

४७ दिवस शुक्रस्त
१४ डिसेंबर २०२५ ते २९ जानेवारी २०२६ या काळात शुक्र अस्त असल्याने मुख्य विवाह मुहूर्त उपलब्ध नाहीत. यामुळेच बोहल्यावर चढण्यासाठी ५१ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.

असे आहेत मुहूर्त
(फेब्रुवारी २०२६ ते जुलै २०२६)
फेब्रुवारी : ३, ५, ६, ७, ८, १०, १२, २०, २२, २५, २६
मार्च: ५, ७, ८, १२, १४, १५, १६, २०, २९
एप्रिल : २१, २६, २८, २९, ३०
मे: १, ३, ६, ७, ८, ९, १०, १३, १४
जून : १९, २०, २३, २४, २७
जुलै : १, २, ३, ४, ७, ८, ९,११

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button