⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

इंधन, गॅस दरवाढ व १२ आमदारांच्या गैरवर्तणूकीच्या निषेर्धात चाळीसगाव शिवसेनेचे आंदोलन

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ जुलै २०२१ । विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्करराव जाधव सभागृहात बोलत असताना विरोधी बाकांवरील सदस्यांनी अभूतपूर्व गदारोळ घातला. अध्यक्षांचा समोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न झाला ते बोलत असलेला माइक ओडण्यात आला त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यावर उपाध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्षांना आई-बहिणीवरून शिवीगाळ केली गेली. या सगळ्या प्रकारामुळे अखेर भाजपाच्या बारा आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. 

या बारा पैकी चौघे माजी कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या एम्पिरिकल डाटा केंद्राने तातडीने दिला पाहिजे अशा आशयाचा ठराव मांडला होता, व ओबीसी समाजाची कशी दिशाभूल भाजपचे नेते करतात हे मा.छगनराव भुजबळ सविस्तर माहिती सागत असतांना आपल पितळ उघडे पडेल म्हणून गोंधळाला सुरुवात केली. व अध्यक्ष सोबत गैरवर्तन व शिवीगाळ केली.

या संपूर्ण प्रकाराचा चाळीसगाव शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करून गेल्या वर्षभरापासून पेट्रोल डिझेल घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात प्रचंड प्रमाणात झालेली दरवाढ ही सर्वसामान्य माणसांना न परवडणारी  असून त्यामुळे महागाईचा आगडोंब भडकण्यास सुरुवात झालेली आहे. याचा देखील शिवसेनेच्या वतीने जाहीरपणे धिक्कार करून पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडर चा दर त्वरित कमी करावा यासाठी केंद्र सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात वाहे मोदी तेरा खेल सस्ती दारू महेंगा तेल पेट्रोल डिझेल दरवाढ कमी झालेच पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जमून हे आंदोलन अत्यंत तीव्र स्वरूपात केले.

यावेळी शहर आणि ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे यांनी यावेळी शासनाचा निषेध करणारे मनोगत व्यक्त केले.

तालुका प्रमूख रमेश बाबा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले असून यावेळी शहर प्रमुख नानाभाऊ कुमावत,  विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, तालुका संघटक सुनील गायकवाड, उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, माजी तालुकाप्रमुख धर्मा काळे, माजी नगरसेवक संजय ठाकरे, प्रभाकर उगले उप तालुका प्रमुख हिम्मत निकम, तुकाराम पाटील, दिलीप पाटील, शिरसगाव दिलीप पाटील, गणेशपुर रघुनाथ कोळी, अनिल पाटील, संजय संतोष पाटील, मुराद पटेल, बैरागी विलास भोई, रामेश्वर चौधरी, महेंद्र परदेशी, देवचंद साबळे, अनिल कुटे, संतोष गायकवाड, गणेश पवार, सुनील महाले, सोमनाथ साळुंखे, सुभाष राठोड, नंदू गायकवाड, दिलीप राठोड, वशिम चेअरमन जावेद शेख, चेतन कुमावत, जावेद शेख, निलेश गायके, जितेंद्र बोदडे ,रॉकी धामणे, गणेश पवार, भूषण चव्हाण, शेख  बापू नवले, आशिष सानप, भाऊलाल पाटील, आबासाहेब पाटील, कैलास वाघ, सागर रघुनाथ पाटील, भाऊसाहेब रावते, अनिल राठोड, मच्छिंद्र राठोड, दिलीप खलाणे, रोशन महाडिक, दीपक काकडे ,सचिन पाटील, योगेश पाटील, गोपाल पाटील, रजेश पाटील आदी उपस्थित होते.