जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावातील विद्यार्थी, पालक आणि संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत प्रेरणादायी पर्वणी चालून आली आहे. निमित्त आहे, जळगावात प्रथमच आयोजित होणाऱ्या “जागतिक शास्त्रज्ञांचा गौरव सोहळा व प्रेरणादायी व्याख्यान” या विशेष सोहळ्याचे. ‘नोबेल फाउंडेशन’ (जळगाव), ‘कंटेंट ओशन इन्फोटेक प्रा. लि.’ आणि ‘सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट’ (फैजपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने या अभूतपूर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा विशेष कार्यक्रम रविवारी, १२ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम लता मंगेशकर सभागृह, रोजलँड इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ऑक्सफर्ड विद्यापीठाशी संलग्न संशोधक व नॅनो टेक्नॉलॉजी तज्ज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन. संशोधन, विज्ञान आणि नवकल्पनांच्या क्षेत्रातील त्यांचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जागतिक क्रमवारीत स्थान मिळविणाऱ्या चार मान्यवर शास्त्रज्ञांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये प्रा. डॉ. प्रमोद माहुलीकर, प्रा. डॉ. डी. जी. हुंडीवाले, प्रा. डॉ. रत्नमाला बेंद्रे आणि प्रा. डॉ. विकास गीते यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. के. बी. पाटील (माजी कुलगुरू) हे असतील, तर प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी (कुलगुरू) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ज्ञान, संशोधन आणि गुणवत्तेचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच विज्ञानप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा कार्यक्रम नोबेल फाउंडेशन, जळगाव, कंटेंट ओशन इन्फोटेक प्रा. लि. आणि सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.








