भुसावळ

प्रवाशांनो लक्ष द्या ! मध्य रेल्वेतर्फे धावणार ६३८ उन्हाळी विशेष गाड्या, भुसावळात असेल थांबा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२२ । रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवासांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण उन्हाळी सुट्या व अतिरिक्त यात्रेकरूंमुळे होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस आणि गोरखपूर दरम्यान १२ सुपरफास्ट साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. यापूर्वी रेल्वेने सुरुवातीला ६२६ प्रारंभिक उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली होती . त्यानंतर आता पुन्हा १२ गाड्या धावणार आहे.

यात गाडी क्रमांक ०२१०३/०२१०४ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी (६ फेरी) धावेल. यात गाडी क्रमांक ०२१०३ सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी १६ ते ३० मेपर्यंत (३ फेरी) प्रत्येक सोमवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ५.१५ वाजेला प्रस्थान करत दुसऱ्या दिवशी दुपारी ५.१५ वाजता गोरखपूरला येईल. तर गाडी क्रमांक ०२१०४ सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी १८ मे ते १ जूनपर्यंत (३ फेऱ्या) प्रत्येक बुधवारी गोरखपूर येथून पहाटे ३ वाजता प्रस्थान करत दुसऱ्या दिवशी दुपारी १.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक ०२१०५/०२१०६ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी (६ फेरी) धावेल.

यात गाडी क्रमांक ०२१०५ सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी १८ मे ते १ जून (३ फेरी) पर्यंत प्रत्येक बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ५.१५ वाजता प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी दुपारी ५.१५ वाजता गोरखपूरला पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०२१०६ सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी २० मे ते ३ जून (३ फेरी) पर्यंत प्रत्येक शुक्रवारी गोरखपूर येथून पहाटे ३ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

कल्याण, नाशिक रोडनंतर थेट भुसावळला थांबा
कल्याण, नासिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, रानी कमलापती स्टेशन, बिना, विरांगना लक्ष्मीबाई स्टेशन, उरई, कानपूर, फत्तेपूर, प्रयागराज, ज्ञानपूर, वाराणसी, औंरिहार, महू, बेलथरा रोड, भटनी जं., देवरिया सदरी या स्थानकांत गाडी थांबेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button