जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२६ । केंद्र सरकारने आज बुधवारी “वंदे मातरम्” बाबत नवीन गाईडलाईन्स जारी केली. नवीन निर्देशानुसार, आता सरकारी कार्यक्रम, शाळा आणि इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये “वंदे मातरम्” वाजवणे बंधनकारक असेल. “जन गण मन” राष्ट्रगीताच्या वेळी जसे उभे राहून आदर करतात तसेच सर्वांना उभे राहून आदर करावे लागेल. तथापि, चित्रपटगृहांमध्ये चित्रपटांच्या वेळी हा नियम लागू होणार नाही.
केंद्रीय गृह मंत्रालयाने आपल्या निर्देशात असे म्हटले आहे की, ‘वंदे मातरम्’चे ३.१० मिनिटांचे हे सहा श्लोक असलेले आवृत्ती अनेक अधिकृत प्रसंगी वाजवले किंवा गायले पाहिजे. ज्यामध्ये तिरंगा फडकवताना, सरकारी कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपतींचे आगमन, त्यांची भाषणे आणि राष्ट्राला संबोधित करण्यापूर्वी आणि नंतर तसेच राज्यपालांचे आगमन आणि भाषणे आधी आणि नंतर यांचा समावेश आहे.

२८ जानेवारी रोजी जारी केंद्रीय गृहमंत्रालयाने वंदे मारतम् याबाबत १० पानांचे निर्देश जारी केले. यात गृह मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, जर राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ आणि राष्ट्रगीत ‘जन गण मन’ एकाच वेळी गायले किंवा वाजवले गेले तर प्रथम ‘वंदे मातरम’ वाजवावे. वंदे मारतम् हे राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर सर्वांना लक्षपूर्वक उभे राहावं लागेल.










