जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील त्वचारोग विभागामध्ये ’जागतिक कुष्ठरोग दिन’ साजरा करण्यात आला. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मध्ये मार्गदर्शन करतांना कुष्ठरोग पुर्णपणे बरा होवू शकतो असे मत येथील त्वचारोग तज्ञ डॉ.दिनेश कुलाल यांनी व्यक्त केले.

“कुष्ठरोगावर मात’ ही यावर्षीची थीम आहे. यानिमित्ताने त्वचारोग विभागामार्फत कुष्ठरोगाविषयी कार्यशाळा घेण्यात आली.यावेळी त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ. पंकज तळेले,डॉ. सागरिका ढवण डॉ. सारा खान डॉ.चेतना शंक्लेशा डॉ.तेजस्विनी फाटे डॉ.अभिलाष मोवळे इ उपस्थित होते.
डॉ.कुलाल यांनी कुष्ठरोग कसा व कशामुळे होतो याची माहिती दिली. व पांढरा चट्टा दिसल्यास नकळत हातांना व पायांना होणारी जखम आढळल्यास त्वरित चाचणी करून उपचार चालू करावेत. कोणत्याही प्रकारची भिती बाळगू नये असे सांगितले. कुष्ठरोग निदानासाठी लागणार्या चाचण्यांविषयी माहिती सांगितली. यावेळी कुष्ठरोगाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला. डॉ. तेजस्वीनी फाटे यांनी आभार मानले.कार्यक्रमास फिजिओथेरपी, नर्सिंग आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.