⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

पाटलांचा नाद नाय करायचा… केक कापून पाळीव कुत्रीचा वाढदिवस साजरा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२२ । आतापर्यंत आपण पाहिलं असावं कि प्राण्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार केले जातात त्यांना हीन दर्जाची वागणूक दिली जाते. परंतु या उलट असणार चित्र आपल्याला खूप कमी दिसत ते म्हणजे प्राण्यांना देखील आपल्या घराचा एक हिस्सा समजणारे प्राणीप्रेमी. आपल्या मुलाबाळांप्रमाणेच प्राण्यांना जीव लावून त्यांना देखील खऱ्या परिवाराचा हिस्सा काही प्राणीप्रेमी बनवत असतात.

जळगावात देखील एका परिवारात परी, बेला आणि भुऱ्या राहतात. आता तुम्ही म्हणाल यात काय मोठी गोष्ट आहे ? तर हे नाव मानवाचे नसून कुत्रा आणि मांजरीचे आहे. हो जळगावातील पाटील परिवारासोबत हे तिघे परिवाराचा हिस्सा बनून राहतात यातील परी नुकतीच एक वर्षाची झाली म्हणून पाटील परिवाराने परी चा वाढदिवस देखील साजरा केला. केक कापून, औक्षण करून, अगदी कॉलनीतील लहान पासून मोठ्यांनी देखील या वाढदिवसाला हजेरी लावली आणि परी ला आशीर्वाद दिले.

परी

image
पाटलांचा नाद नाय करायचा… केक कापून पाळीव कुत्रीचा वाढदिवस साजरा 1

परी म्हणजे पोमेरेनियन जातीचं कुत्र पाटील परिवाराने या कुत्री ला परी नाव दिले आहे. आता फक्त परीच नाही तर बेला आणि भुऱ्या देखील आहे. बेला म्हणजे जर्मन शेफर्ड जातीचं कुत्र हि देखील फिमेल डॉग आहे आणि पाटील परिवाराने हिला बेला नाव दिल आहे

बेला

image 1 edited
पाटलांचा नाद नाय करायचा… केक कापून पाळीव कुत्रीचा वाढदिवस साजरा 2

बेला अजून फक्त तीन महिन्यांची आहे. व पाटील परिवारात एक बोका देखील आहे ज्याचं नाव त्यांनी भुऱ्या ठेवलं आहे. हा त्यांना रस्त्यावर भेटला असून या परिवाराने बोक्याला हक्कच घर दिल आहे.