---Advertisement---
बोदवड

मंदिरात हनुमान चालीसा पठन करून आ. गिरीश महाजनांचा वाढदिवस साजरा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२२ । जामनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ. गिरीष महाजन यांनी त्यांच्या वाढदिवसानिम्मित कोणतेही हार, पुष्पगुच्छ न आणता फटाके जाहिरात, बैनरबाजी न करता मला न भेटता गावा-गावात समाजभिमुख, सामाजिक, आरोग्य विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आव्हान केले होते. त्या आवाहनला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टी, बोदवड़ च्या वतीने सकाळी शहरातल्या मोठ्या मारोती मंदिरात सामुहिक हनुमान चालीसा पठन व महाआरती करून प्रसाद वाटप करण्यात आले.

girish mahajan

तसेच शहरातल्या आत्मसम्मान फाउंडेशन येथील मनोरुग्णांना कार्यकर्त्यांच्या वर्गनीतुन साप्ताहिक अन्नदान करण्यात येणार आहे. असे सामाजिक उपक्रम घेऊन भारतीय जनता पार्टी, बोदवड़ तर्फे गिरीष महाजनांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी भाजपा बोदवड़ तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, तालुका उपाध्यक्ष भागवत चौधरी, ता. सरचिटणीस अमोल देशमुख, तालुका सोशल मीडिया प्रमुख रोहीत अग्रवाल, शहराध्यक्ष नरेश आहूजा, शहर सरचिटणीस वैभव माटे, आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---