जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२१ । इंदोरकडून विदेशी दारू घेऊन जात असलेली कार जिल्हापेठ पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी आकाशवाणी चौकात पकडली. याप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे, सहाय्यक निरीक्षक महेंद्र वाघमारे, उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर, कर्मचारी संजय महाजन, गणेश निकम, दिलीप पाटील, संदीप पाटील, होमगार्ड विजय साळुंखे, प्रशांत मिस्तरी, निवृत्ती राखोडे हे आकाशवाणी चौकात गुरुवारी बंदोबस्त करीत होते. सायंकाळी ५.३० वाजता महामार्गावरून जात असलेली चारचाकी क्रमांक एमपी.०९.डब्ल्यूसी.०७३२ ला थांबविले. कारमध्ये बसलेल्या व्यक्तींची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. गाडीची तपासणी केली असता त्यात दोन विदेशी दारूचे खोके भरून १७ हजार २८० रुपयांची मिळून आली. याप्रकरणी पोलीस नाईक संजय रमेश पवार यांनी फिर्याद दिल्यावरून हरीशकुमार शोभाराजमल पेरुवानी, राहुल हिरालाल बादवानी, गिरीश भगवानदास खेमचंदनी, गौरव सुनील प्रजापत, सोनू मनोहर कटारिया सर्व रा.इंदोर, मध्यप्रदेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.