जळगाव लाईव्ह न्यूज । आरोग्याच्या आणीबाणीच्या काळात पैशांची जुळवाजुळव करणे हे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोठे आव्हान असते. मात्र, आता जळगावकरांची ही चिंता मिटणार आहे. शहरातील अग्रगण्य ‘महादेव हॉस्पिटल’ने आता सर्व प्रमुख विमा कंपन्यांसोबत संलग्न होऊन ‘कॅशलेस उपचार सुविधा’ सुरू केली आहे. यामुळे रुग्णांना खिशातून एकही रुपया न घालता दर्जेदार उपचारांचा लाभ घेता येणार आहे.

उपचार आता चिंतामुक्त !
अनेकदा अचानक ओढवलेल्या आजारपणामुळे कुटुंबाची आर्थिक ओढाताण होते. हीच बाब लक्षात घेऊन महादेव हॉस्पिटलने ‘चिंतामुक्त उपचार, निरोगी जीवनाकडे एक पाऊल’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून ही सेवा कार्यान्वित केली आहे. तुमच्याकडे कोणत्याही नामांकित विमा कंपनीची पॉलिसी असल्यास, तुम्ही विनाविलंब आणि विनाखर्च उपचारांसाठी या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

एकाच छताखाली सुपर स्पेशालिटी सुविधा
महादेव हॉस्पिटलमध्ये केवळ कॅशलेस सुविधाच नाही, तर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध महत्त्वाच्या विभागांत उपचार उपलब्ध आहेत. यात न्यूरॉलॉजी व न्यूरोसर्जरी विभागात मेंदू व मणक्याचे सर्व विकार, कार्डिओलॉजी विभागात हृदयरोग विभाग, युरॉलॉजी विभागात मूत्रविकार संबंधित उपचार, नेफ्रॉलॉजी विभागात किडनी विकार व डायलिसिस उपलब्ध आहेत.

सर्व प्रमुख विमा कंपन्यांशी संलग्नता
हॉस्पिटलने स्टार हेल्थ, टाटा AIG, SBI इन्शुरन्स, ओरिएंटल, न्यू इंडिया, ICICI प्रुडेन्शियल, बजाज आलियान्झ, केअर हेल्थ, मेडी असिस्ट, अकॉ, आदित्य बिर्ला, HDFC लाईफ, लिबर्टी जनरल आणि पॅरामाउंट हेल्थ अशा सर्व मोठ्या कंपन्यांशी करार केला आहे.जळगावच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच आकाशवाणी चौक, राष्ट्रीय महामार्ग येथे हे हॉस्पिटल कार्यरत आहे. अधिक माहितीसाठी किंवा आपत्कालीन स्थितीत नागरिक ९३२५१५०००४, ९११२०२००५५,९११२०३००५५ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
“रुग्णांना वेळेवर आणि पैशांच्या अडचणीशिवाय उत्तम आरोग्य सेवा मिळावी, हाच आमचा प्रामाणिक उद्देश आहे.” – रुग्णालय प्रशासन, महादेव हॉस्पिटल, जळगाव.






