Jalgaon : चेक बाउन्स प्रकरणात कर्जदाराला 1 वर्षाची कैद व दुप्पट दंडाची शिक्षा

फेब्रुवारी 13, 2026 2:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । कर्जाच्या परतफेडीसाठ दिलेला चेक न वटल्याप्रकरणी धनवर्ष अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीकडून कर्ज घेतलेल्या कर्जदाराला जळगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी १ वर्ष साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. लखीचंद भगवान पाचपोळ असं शिक्षा झालेल्या कर्जदाराचे नाव आहे.

cheque bounce

काय आहे प्रकरण
पाचपोळ यांनी सन २००६ मध्ये धनवर्षा पतसंस्थेकडून कर्ज घेतले होते या कर्जाच्या परतफेडीपोटी त्यांनी १० जानेवारी २००६ रोजी ९ लाख ७७ हजार रुपयांचा चेक संस्थेला दिला होता. मात्र खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने हा चेक बँकेतून परत आला. पतसंस्थेने रीतस कायदेशीर नोटीस बजावूनही पाचपोळ यांनी रकमेचा भरणा केला नाही. अखेर संस्थेचे वसुली अधिकारी संजय श्रीधन सोनवणे यांनी खटला दाखल केला.

त्यात पाचपोळ दोषी सिद्ध झाल्याने त्यांना १ वर्ष साधी कैद आणि मूळ रकमेच्या दुप्पट म्हणजेच १९ लाख ५४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच फिर्यादी संस्थेचा खटल्यासाठी झालेला १५ हजार रुपये अतिरिक्त खर्चही आरोपीने द्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. धनवर्षा सोसायटीच्या वतीने अॅड. केतन जयदेव ढाके यांनी बाजू मांडली. दिवाणी न्यायाधीश जयदीप एम. चौहान यांनी हा निकाल दिला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now