---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

मुक्ताईनगरात कारमध्ये सापडली लाखांची कॅश

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत एसएससी पॉईंट मुक्ताईनगर तहसीलच्या अंतर्गत नाकाबंदीत संशयित वाहन तनासणीत ४ लाख १० लाखाची रक्कम आढळून आली.

500 rs note jpg webp

मुक्ताईनगर पोलीस ठाणे हददीत विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर रस्त्यावर एस. एस. टी पॉईंट भोटा फाटा येथे नाकाबंदी चालु असताना नाकाबंदी कामी कार्यरत असलेले उमेश मुरलीधर पाटील, वरीष्ठ सहायक पंचायत समिती मुक्ताईनगर, पो. ह. तडवी, पो.शि. पवार यांनी सौरव पाटील जळगाव उपप्रादेशिक परिवहन विभाग व त्यांचेसोबत असलेले पथकाचे मदतीने ब-हाणपुर कडुन मुक्ताईनगरकडे जाणारी संशयित मोटर कार क्रमांक एमपी. ६८ सी २३७८ हे वाहन थांबवले असता त्यात दोन इसम नामे मगन केतन जांभळकर रा. लालबाग कोयला गेट समोर, बऱ्हाणपर (मध्यप्रदेश) व जयेश पंडीत चौधरी रा. आडगाव जि. बऱ्हाणपुर (मध्यप्रदेश) असे मिळून आले.

---Advertisement---

त्यात रक्कम ४ लाख १० हजार रुपये आढळले. या रकमेबाबत मोटर कार मधील इसमांना समाधानकारक कागदपत्रे सादर करता न आल्याने पो.ह. तडवी यांनी दोन पंचासमक्ष रक्कम एस. एस. टी. पथकातील महसुल विभागाचे जबाबदार व्यक्ती उमेश पाटील यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---