बंद घर फोडून लांबविली रोकड

एप्रिल 22, 2022 4:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज। २२ एप्रिल २०२२ । अमळनेर शहरातील वैदूवाडा परिसरात बंद घर चोरटयांनी लक्ष करीत २५ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना नुकतीच उघडकीला आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime ५ jpg webp

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, संजय प्रभाकर सैंदाणे (वय-३०) रा. ताडेपुरा, मंगल नगर, वैदुवाडी अमळनेर हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि २० एप्रिल रोजी मध्यरात्री दरम्यान ताडेपुरा भागातील अनोळखी अशा दोघांनी बंद घरात घुसून दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील २५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संजय सैंदाणे यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांवरून अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पो.हे.कॉ. सुनिल पाटील हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now