⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 6, 2024
Home | जळगाव जिल्हा | अबब..! जळगावात पोलीस नाकाबंदीदरम्यान सापडली ‘इतक्या’ कोटींची रोकड, पहा VIDEO

अबब..! जळगावात पोलीस नाकाबंदीदरम्यान सापडली ‘इतक्या’ कोटींची रोकड, पहा VIDEO

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२४ । विधानसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर सुरक्षेसाठी तसेच आचारसंहितेची अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. जळगाव जिल्ह्यात पोलीस प्रशासनाकडून जागोजागी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. याच दरम्यान अमळनेर तालुक्यात तपासणी नाक्यावर पोलिसांच्या तपासणी वाहनात दीड कोटी रुपयांची रक्कम आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

अमळनेर तालुक्यात १६ लाख सापडले
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगावच्या अमळनेर तालुक्यातील चोपडाई तपासणी नाक्यावर पोलीस तपासणी करताना एका वाहनात १६ लाख ३८ हजार रुपयांची रोख रक्कम आढळल्याचे समोर आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून तपासणी करत कारवाई करण्यात आली आहे.

पथकाने ही रक्कम उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासमक्ष तहसील कार्यालयात पंचनामा करून जप्त केली. रक्कम दहा लाखाच्यावर असल्याने ती आयकर विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. ज्या वाहनात रक्कम आढळली ते वाहन चोपडा येथील असून रक्कम ही कापूस व्यापाऱ्याची असल्याचे सांगण्यात येत आहे.

कासोदामध्ये तब्बल दीड कोटींची रक्कम
दुसरीकडे एरंडोल तालुक्यात कासोदा गाव येथे एका कारमध्ये दीड कोटीची रोकड मिळाल्याने खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल-पारोळा मतदार संघातील कासोदा गावात पोलिसांच्या पथकाने नाकाबंदी दरम्यान कारमधून तब्बल दीड कोटींची रोकड जप्त केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कासोदा गावातील फरकांडे चौफुलीवर पोलिसांचे पथक सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नाकाबंदीसाठी थांबलेले होते. याचवेळी एका क्रेटा कारची तपासणी केली असता पोलिसांना तब्बल एक कोटी 45 लाखाची रोकड सापडली. दरम्यान रात्री उशिरापर्यंत ही रोकड नेमकी कोणाची आणि कशासाठी आणली होती? याचा खुलासा होऊ शकला नव्हता. पोलीस याचा शोध घेत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.