जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२४ । जळगाव तालुक्यातील आसोदा येथे मद्याच्या नशेत मुलीचा हात पकल्यामुळे जमावाने केलेल्या मारहाणीत भास्कर दगडू भंगाळे (वय ४३) याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हा आसोदा गावासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला ७ जणांवर पोलीस पाटलाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे तर मृत व्यक्तीविरुद्ध देखील विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील असोदा येथे गुरुवार दि. ४ जुलै रोजी दुपारी साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान गावातील गोकुळ नगर भागात मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून काही महिला व पुरुषांनी भास्कर उर्फ भागवत दगडू भंगाळे या ४३ वर्षीय ईसमाला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत भास्कर भंगाळे यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी असोदाचे पोलीस पाटील आनंदा सिताराम बिऱ्हाडे (वय ५२) यांच्या फिर्यादीवरून नवीन कायदा भारतीय न्याय संहिता नुसार १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५२, १०३(१) नुसार खुनाचा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात संशयित आरोपी म्हणून सोन्या रवींद्र कोळी, शुभम कैलास कोळी, महेंद्र गोरखनाथ कोळी, भैय्या उर्फ योगेश रवींद्र कोळी, हेमंत रवींद्र कोळी, रवींद्र एकनाथ कोळी, अनिता प्रकाश कोळी हे संशयित आरोपी आहेत.
तर दुसरीकडे २२ वर्षीय मुलीची छेड काढल्यानुसार विनयभंगाचा गुन्हा मयत भास्कर भंगाळे यांच्यावर देखील तालुका पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात रवींद्र एकनाथ कोळी यांना अटक करण्यात आली आहे.