जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर पंचायत समितीचे विद्यमान प्रभारी गट विकास अधिकारी संतोष नागटिळक यांच्यासह इतर अधिकाऱ्यांविरुध्द कालपासून सोशल मीडिया व ऑनलाईन पोर्टलवर बदनामी कारक मजकूर प्रसारीत होत आहे. दरम्यान, याप्रकरणात बीडीओ नागटिळक आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी एका व्यक्तीने न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. याचिकेवर दि.१ एप्रिल रोजी कामकाज होणार आहे.
बीडीओ यांच्या प्रकरणात वस्तुस्थिती अशी की, बीडीओ व इतर अधिकारी यांचे विरुध्द संतोष कोळी नामक व्यक्तीने गुन्हा दाखल करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६/३ अन्वये मुक्ताईनगर येथील न्यायालयात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मिळण्यासाठी दि.२ मार्च २०२२ रोजी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. सदरच्या अर्जावर न्यायालयाने putup for hearing असे आदेश करून पुढील सुनावणी १ एप्रिल २०२२ ही ठेवलेली आहे.
बीडीओ आणि संबंधितांविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले नाही. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून मुक्ताईनगर पोलीस निरीक्षकांना देखील गुन्हा दाखल करण्याचे असे कोणतेही आदेश प्राप्त झाले नसतांना काही ऑनलाइन पोर्टल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभारी बी.डी.ओ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे चुकीचे वृत्त प्रसारीत केलेले आहे. तसेच काही वृत्तपत्रांनी देखील बातमी प्रसिद्ध केलेली आहे.
संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली असता मुक्ताईनगर पोलिसात कोणताही गुन्हा दाखल नाही. किंव्हा न्यायालयाने तसे आदेश देखील दिलेले नाही. अनेकांनी या बातमीसाठी पोलीस निरीक्षक यांचेकडून देखील सदरील प्रकाराची खात्री व पडताळणी केलेली नाही किंवा संबंधित कोर्टाने या प्रकरणात खरोखर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे किंवा काय? याबाबत कोणतीही शहनिशा न करता कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी न करता सदरचे वृत्त प्रसारित केले आहे. गटविकास अधिकारी नागटिळक हे संपूर्ण तालुक्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून नावलौकिकास आहे. ते एक शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तालुक्यात नावारूपास असून जनमानसात त्यांची ख्याती आहे.