अज्ञाताने जाळल्या गाड्या : परिसरात खळबळ
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२२ । जळगाव शहरातील गणपती नगरात आज दि २८ रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात माथेफिरूने कार आणि दुचाकी जाळल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
गणपती नगरातील रहिवासी श्रीची नरवानी यांच्या मालकीची कार अज्ञात माथेफिरुने आज पहाटे सव्वा तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान जाळली. ही बाब लक्षात येताच नरवानी यांनी अग्निशमन दलाला आणि रामानंद नगर पोलीस ठाण्याशी संपर्क केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत नरवानी यांची कार मोठ्या प्रमाणावर जळून नुकसान झाले आहे. नरवानी यांची कार जाळल्यानंतर माथेफिरुने परिसरात एक दुचाकी देखील जाळल्याचं समोर आलं आहे. या घटनेसंदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गणपती नगरातील सातपुडा हाउसिंग सोसायटी येथे मिलन सलामतराय तलरेजा (वय-३०) आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्यांचे ऑटोपार्टस विक्रीचा व्यवसाय आहे. शुक्रवारी २८ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीन वर्षाच्या सुमारास अज्ञात माथेफिरूने कापड्यावर पेट्रोल टाकून कार क्रमांक (एमएच 19 डीव्ही 4193) आग लावून पेटवून दिली. दरम्यान त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांन फोन करून कारला आग लागण्याची माहिती मिलन तलरेजा यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी तातडीने धाव घेऊन आग विजाण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत या आगीमध्ये कारचे जळून नुकसान झाले होते. विशेष म्हणजे तलरेजा यांनी आठ महिन्यापूर्वीच हे कार विकत घेतली होती. त्याच पद्धतीने त्यांच्याच गल्लीत राहणारे श्रीचंद घनश्यामदास अडवाणी (वय ४७) यांची देखील कार क्रमांक (एमएच १९ सीझेड २२७७) आणि इलेक्ट्रॉनिक दुचाकी (एमएच १९ डीझेड ७२४४) यांच्यावर देखील त्याच पद्धतीने डिझेल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार घडला. शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी तातडीने धाव घेवून बोरींगच्या सहाय्याने आग विझविण्यात आली. या संदर्भात मिलन तलरेजा यांच्या फिर्यादीवरून शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामानंद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.