बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

जळगाव जिल्ह्यात ‘बीआरएस’ सक्रिय ; होर्डिंग्जने वेधले सर्वांचे लक्ष !

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२३ । जळगाव जिल्ह्यातही भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष सक्रिय झाला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकरा विधानसभा व एका जिल्हा समन्वयकाची नेमणूक करण्यात आली आहे. य़ाच बरोबर संपुर्ण जिलह्यात मोठमोठे होर्डिंग, घरोघरी प्रचार व सदस्य नोंदणी अभियान सुरू झाले आहे.

राज्यत विविध पक्ष सक्रिय होत आहेत. भारत राष्ट्र समिती या नव्या पक्षाने गावागावांत प्रचार सुरू केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात प्रवेश केला आहे.

मराठवाड्यापासून सुरवात झाल्यावर आता उत्तर महाराष्ट्रातही पाऊल टाकली आहेत. जळगाव जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये केसीआर यांच्या फोटोसह ‘अबकी बार….किसान सरकार’ ही टॅगलाइन असलेले प्रचाराचे होर्डिंग्ज झळकत आहेत.

काही कार्यकर्ते टॅबवर सदस्य नोंदणी करीत आहेत. ही सर्व जबाबदारी पक्षाचे जिल्हा समन्वयक देवेंद्र वराडे यांच्या नेतृत्वाखाली पार पाडली जात आहे. वराडे हे या आधी शेतकरी संघर्ष संघटनेत कार्यरत होते. संघटनेत शहराध्यक्ष ते उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदापर्यंत मजल मारली.