⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

 आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी – अभिजित राऊत

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२२ । – जळगाव जिल्हयातील १४ तालुक्यातील १०० ग्रामपंचायतीतील ११४ रिक्त सदस्य पदाच्या होणाऱ्या पोटनिवडणूकीसाठी मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडून पारंपारिक पध्दतीने प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यासोबत संदर्भिय पत्र व निवडणूक / पोटनिवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची यादी जोडलेली आहे.

          सदर पोटनिवडणूक कार्यक्रमानुसार सद्यस्थितीत अनु.जाती, अनु.जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातील रिक्त झालेल्या एकुण ११४ सदस्य पदासाठी दिनांक ५ जून, २०२२ रोजी मतदान घेण्यात येणार असून दिनांक ६ जुन, २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव असलेल्या रिक्त जागा प्रथमत: सर्वसाधारण म्हणून अधिसुचित करावयाचे असल्याने सदर रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी स्वतंत्रपणे पोटनिवडणूक कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे मा. राज्य निवडणूक आयोग यांचे कार्यालयाकडून कळविण्यात आलेले आहे.

          पोटनिवडणूक असलेल्या ग्रामपंचयतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहिर होईपर्यंत आचार संहिता लागू राहणार असल्याचे मा. राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. ग्रामपंचायत पोटनिवडणूकीकरीता मा. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील या संदर्भिय आदेशानुसार आदर्शआचारसंहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.