गुन्हे

अरे बापरे : कापसाच्या शेतात गांज्याची शेती अन,

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज । १९ ऑक्टोबर २०२२ । नंदुरबार जिल्ह्यातील शाहदा तालुक्यातील बामखेडा शिवारात कापसाच्या शेतात गांजाची शेती करणार्‍या एका तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून अटक केली. शेतातून सुमारे तीन लाख 52 हजार रुपये किमतीचा 50 किलो गांजा जप्त करण्यात आला.

सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बामखेडा शिवारात एकाने कापसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळाली होती.त्यांनी लागलीच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांचे एक पथक तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक व सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ कर्मचार्‍यांसह घटनास्थळी गेले असता संशयित राकेश हिरालाल शिरसाठ (32, रा. बामखेडा) यांनी शेतातून पळ काढण्याच्या प्रयत्न केला. त्याला पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने पकडले.

कापसाच्या शेतातून पोलीस पथकाने 50किलो 315 ग्रॅम वजनाचा तीन लाख 52 हजार 205 रुपये किंमतीचे 25 गांजाची झाडे जप्त केली असून संशयित आरोपी राकेश हिरालाल शिरसाठ यांच्याविरुद्ध सारंखेडा पोलीस ठाण्यात गुंगीकाराक औषधे द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, शहाद्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, पोलीस हवालदार दीपक गोरे, पोलीस नाईक दादाभाई मासुळ, विकास कापुरे, किरण मोरे, राजेंद्र काटके ,दिनेश लाडकर, संजय रामोळे, चेतन चौधरी, शानाभाऊ ठाकरे, विजय गावित यांच्या पथकाने कारवाई केली.

Related Articles

Back to top button