⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | नोकरी संधी | कॅनरा बँकेत तब्बल 3000 पदांसाठी भरती ; पदवी उमेदवारांना सुवर्णसंधी

कॅनरा बँकेत तब्बल 3000 पदांसाठी भरती ; पदवी उमेदवारांना सुवर्णसंधी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जर तुमचे स्वप्न देखील बँकेत नोकरी करण्याचे असेल तर तुमच्यासाठी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. कॅनरा बँकेत तब्बल 3000 पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट canarabank.com ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत चालेल.अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराला nats.education.gov.in या वेबसाइटवर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल.

ही भरती शिकाऊ पदांसाठी होणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे, देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 3000 शिकाऊ पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाईल. ज्यामध्ये 1302 पदे सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत. 740 पदे OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी, 479 पदे SC, 184 पदे ST, 295 पदे EWS आणि 112 पदे PwBD साठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

पात्रता काय?
या भरतीसाठी अर्ज करणार उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.

वयाची अट काय?
उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 28 वर्षे असावे. उमेदवाराचा जन्म 1 सप्टेंबर 1996 पूर्वी आणि 1 सप्टेंबर 2004 नंतर झालेला नसावा. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क : अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल. SC, ST आणि PwBD प्रवर्गातील उमेदवारांना अर्जाचे शुल्क भरावे लागणार नाही.

ॲप्रेंटिसशिप दरम्यान उमेदवारांना दरमहा 15,000 रुपये स्टायपेंड दिले जाईल.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.