प्रवाशांनो लक्ष द्या ! रद्द झालेल्या या रेल्वे गाड्या पुन्हा ‘ट्रॅक’वर

मार्च 31, 2026 11:05 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । नागपूर विभागातील गोंदिया रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या तांत्रिक व दुरुस्ती कामांमुळे तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या आता पुन्हा नियमितपणे धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असून संबंधित गाड्या त्यांच्या नियोजित वेळापत्रकानुसार आहेत.

train

पुन्हा सुरू होणाऱ्या गाड्यांचा तपशील :
क्र. १८०३० शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस : ४ एप्रिल ते २४ एप्रिल या कालावधीत शालीमार येथून तर क्र. १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस – शालीमार एक्सप्रेस : ६ एप्रिल ते २६ एप्रिल या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून नियोजित वेळेनुसार धावेल.

तर क्र. १२१०१ लोकमान्य टिळक टर्मिनस शालीमार ज्ञानेश्वरी सुपरफास्ट एक्सप्रेस : ४, ५, ७, ८, ११, १२, १४, १५, १८, १९, २१ व २२ एप्रिल आणि क्र. १२१०२ शालीमार लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी सुपरफास्ट एक्सप्रेस : ६, ७, ९, १०, १३, १४, १६, १७, २०, २१, २३ व २४ एप्रिल रोजी नियोजित वेळेनुसार धावेल, असे रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.

गोंदिया स्थानकावरील कामे अंतिम टप्प्यात पोहोचत असल्याने रेल्वे वाहतूक हळूहळू सुरळीत होत आहे. या निर्णयामुळे विदर्भ व मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now