राज्यपाल कोश्यारी यांची नियुक्ती रद्द करा : छावा मराठा युवा महासंघ

नोव्हेंबर 21, 2022 7:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२२ । राज्यपाल कोश्यारी यांची नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी करत छावा मराठा युवा महासंघाच्यावतीने कोश्यारी व त्रिवेदिंचा निषेध करण्यात आला. याबाबत महामहीम राष्ट्रपती यांचेकडे जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

jalgaon 2022 11 21T192755.109 jpg webp

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी विविध ठिकाणी निषेध केला जात आहे. त्यानुषंगाने छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने देखील राज्यपाल कोश्यारी यांची नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत महामहीम राष्ट्रपती यांचेकडे जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , किरण ठाकूर , उज्वल पाटिल , भीमराव सोनवणे , ज्ञानेश्वर मिस्तरी , आकाश निकम , प्रांजल नेमाडे , कृष्णा जमदाडे , सागर मोतीराडे आदी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now