⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत भुषण भवर प्रथम

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२२ । श्रीमंत शिवाजी राजे उद्यान विद्या व कृषी महाविद्यालय फलटण जिल्हा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आंतर महाविद्यालयीन ऑनलाईन निबंध स्पर्धा घेण्यात आली. ज्यात येथील डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे द्वितीय वर्षात शिकत असलेल्या भुषण भवर या विद्यार्थ्याने प्रथम पारितोषिक पटकविले.

या स्पर्धेत महात्मा फूले कृषी विद्यापिठ राहुरीच्या संलग्नित अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवुन आणणे हाच या स्पर्धेचा उद्देश होता. या स्पर्धेत भुषण भवर या विद्यार्थ्याने २१ व्या शतकातील कृषी क्षेत्रात तरुणांचा सहभाग आणि नवकल्पना या विषयवार निबंध लिहुन प्रथम पारितोषिक पटकविले. या यशाबद्दल प्राचार्य डॉ.पी.आर.सपकाळे, उपप्राचार्य डॉ.कुशल ढाके, डॉ. ललीत जावळे व प्रा.एन.डी.पाटील यांनी अभिनंदन केले.